मंजुळ हा नाद आला, कोठोनी बंसिचा

मंजुळ हा नाद आला, कोठोनी बंसिचा ।
पहायासी कृष्ण! झाला, जिव वेडा आमुचा ।॥।धृ० ।।
कुणि सांगा मार्गियांनो! दिसला तो का कुणा? ।
त्याविण या लोकि झालो,दुबळासा मी सुना ।।१॥।
द्‌चकोनी उठविताना, स्वप्नचिसा भेटला ।
झणि पाहो परि न भासे,ऐसा का करि भला? ।।२॥।
अजुनी ना विसरला तो, खेळवणे आपुले ।
अम्हि दुःखी बहुत त्याने, का ना हे जाणले? ।।1३।।
मज वाटे भेट द्याया, लपुनी तो येतसे ।
तुकड्याची हाक कानी, लांबुनिया घेतसे ।।४॥।