नवल वानु मी किती गुरुचे? नवल वानु

नवल वानु मी किती गुरुचे? नवल वानु० ॥धृू०॥।
दु:संगाने भ्रमलो आम्ही, त्यांनी दिली सुमती ।।१॥
अंधाराते दावुनि बोधे, लावि प्रकाशा-पथी ।।२॥
जग हे भ्रमबाजारी भुलले, दिसले तव निश्‍चिती ।।३॥
तुकड्यादास म्हणे निज ओळख, दावित सत्संगती ।।४॥