कर अपुला गुरु सगा, गड्या रे ! कर अपुला

कर अपुला गुरु सगा, गड्या रे ! कर अपुला० ॥धृव०।।
सद्गुरुज्ञानाविण सुख नाही, का भ्रमलासी उगा? ।।१॥
चलतीचे जगि सगे-सोयरे, शेवटि देतिल दगा ।।२॥
गुरु-भजनाचे अंजन घालुनि, दुर कर माया-ढगा ।।३॥
तुकड्यादास म्हणे नित नेमे, विसरु नको लक्ष्य, गा ।।४॥