मी पाहि तसरा रुप धरशिल ना? मज पावन तू हरि करशिल ना?

मी पाहि तसरा रुप धरशिल ना? मज पावन तू हरि करशिल ना?
मी पाहता तुज तू दिसशिल ना?मी हसता तू हरि! हसशिल ना?।।धृ०।।
(अंतरा) सुंदर वनि वेलांच्या तळुनी।
झुळझुळ नदि वाहे वळवळुनी ।
गर्द॑ तरू हिरवळले मिळ्नी ।
अधरी बंसि तू धरशिल ना? ध्वनि मधुर कर्णि तू भरशिल ना? ।।1।।
(अंतरा) मयुर - पिसारा मुकुटावरती ।
कांबळ खांदी, उरि वेजंती।
कुंडल-शोभा झळके खुलती ।
मन्मंदिरी तू स्थिरशिल ना? द्या प्रेम-सुखी उध्दरशिल ना? ।।२॥
(अंतरा) एक्लांताच्या ह॒दयकाशी ।
मी पाहिन तव श्‍याम रूपासी।
आळवीन तुज मग हृषिकेशी !।
देह-भाव मग हरशिल ना?मज तव स्वरुपी लिन करशिल ना? ।।३॥
(अंतरा) नित्य असा मी करि अभ्यासा।
स्फूर्ति सदा देशिल ना दासा? ।
ना करि हरि !मम आस हताशा।
कृपा-हस्त शिरि धरशिल ना ?हा तुकड्या अपुला करशिल ना? ।।४॥