प्रपंचहि का असा व्हावा? जिथे हरिचे नसे नाम

प्रपंचहि का असा व्हावा? जिथे हरिचे नसे नाम।
कृपाळू श्रीहरीने हो ! दिले नरकायि शुभ काम ॥|धृ०॥
मनाची धाव ती सगळी, विषय-भोगातची लोळे ।
कुठे करतील तप भोळे? नसे एका मुखी राम ।।१॥।
मनी घरदार ते खेळे, म्हणे कोठे गडी सगळे? ।
सदा धन - संपदी लोळे, पहाया वाढला नेम ।।२॥
मला हे द्या, मला ते द्या, मला द्या सर्व घरदार ।
बुडविले यातची थोर, कशाचा तो पुढे श्याम? ।।३॥
प्रपंची लावुनी आस, स्व-घरचा सोडला ध्यास ।
म्हणे तुकड्या तया नाश, कधी ना भेटतो राम ।।4॥।