२ . जीवाच्या विकासाचा मार्ग
गुरुदेव सेवामंडळाच्या आजीवन प्रचारकांनो , एका महात्म्याने म्हटले आहे :
नदी उगम स्थिरावे , तरी सिंधूपणा कां न पावे ।तैसेजीवाचे ब्रह्म कां न व्हावे ,
ऐसे स्थिती राहता ? पाण्याच्या अति संचयाला समुद्राचे स्वरूप प्राप्त होऊ शकते . नदी जर उगमस्थानीच स्थिर झाली तर तिला सागरपण कां प्राप्त होऊ शकणारा नाही ? अर्थातच होईल . तद्वत जीवाची पूर्ण स्थिती म्हणजे बह्मपण . जीवाचे अज्ञान नष्ट झाले आणि तो जीव शुध्द स्थितीत स्थिरावला तर त्यासही ही स्थिती प्राप्त व्हायला काही हरकत नाही . परंतु नदीच्या प्रवाहाला सागरत्व येत नाही ; तसेच जीवणपणाला ब्रह्मपणही सहज प्राप्त होत नाही . कारण त्याची अज्ञानदशा जीवाला जेव्हापासून सृष्टीतील भिन्नभिन्न आमिषांचे व्यसन जडले तेव्हापासून त्याच्या सुख - दु : खाला सुरूवात झाली . पण हाच जीव जेव्हा आपल्या मूळच्या स्थितीवर येण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा त्याला परब्रह्माची विशालता प्राप्त होऊ लागते .
भिन्नभिन्न माणसांची भिन्नभिन्न आत्मस्थिती
सर्व माणसे सारखीच असतांना त्यांच्या आत्मस्थितीत आपणाला भेद पहायला मिळतो तो का ? एकाची स्थिती इतकी दुबळी असते की तो स्वत : च्या कुटुंबाचाही भार उचलू शकत नाही . त्यांची शक्ती त्याच्या एका कुटुंबाचा भार उचलायला अपुरी पडते . तर दुसरा मनुष्य साऱ्या विश्वाची काळजी वहायला समर्थ असतो . त्याची सर्व व्यापकता इतकी विशाल असते की साऱ्या विश्वाची सुखदुःखे तो आपली समजतो आणि त्यांच्या निवारणाची चिंता वाहतो . यावरून प्रश्न निर्माण होतो की प्रत्येक माणसाच्या शरीरात
एकचएक द्रव्य असतांना असा फरक कां ? अशी कोणती विशेषता आहे की । त्यामुळे एक मनुष्य आपल्या कुटुंबाखालीच दबलेला असतो आणि दुसरा आपल्या कृपेच्या पांघुरणाखाली साऱ्या विश्वाला झोपवू शकतो ? याचे कारण असे की चित्ताची पवित्रता जसजशी वाढत जाते तसतशी त्याची विशालताही फाकत जाते . अशी चित्ताची शुध्दता , आचार , विचार आणि शुध्द दिनचर्या यातून निर्माण करावी लागते . मनुष्याला निरनिराळी व्यसने जडतात . तो कामक्रोधादी विकारांच्या आहारी जातो . त्यामुळे त्याची शक्ती आकुंचित होते . वास्तविक सर्वच मानवप्राण्यांत अशी स्थिती प्राप्त करून घेणारी शक्ती असते याकरिता वय , लिंग किंवा धर्मभेद आडवा येत नाही . सर्वांना साध्य होऊ शकणारी ही गोष्ट आहे . पण जीव आपल्या कुकर्मामुळे स्वत : स लहान करून घेतो . यासाठी त्याला अशा अहितकारी बंधनातून सोडविणे आवश्यक असते . असे केल्याने त्याची सर्व व्यापक वृत्ती हळूहळू विकास पावत जाईल . विस्तवावर जोपर्यंत राख साचलेली असते तोपर्यंत तिचे तेजस्वी स्वरूप नजरेसमोर येत नाही . पण एकदा का ती राख उडवून लावली की मग तिचे मूळ स्वरूप दिसायला लागते . आत्म्यावर अज्ञान , आसक्ति , विषयवासना इत्यादीची आवरणे चढलेली असतात . त्यामुळे त्याचे मूळस्वरूप अप्रगत राहून त्याचे आकुंचितपणच आपल्या नजरेस दिसते . त्यामुळे एका माणसाची शक्ती कुटूंबासाठीही अपुरी पडते तर दुसऱ्याची विश्वाला पुरून उरते .हे विश्वची माझे घर अशी त्याची मति थोर होते आणि शारीरिक सुखे न भोगताही त्याला अपार आनंदाचा लाभ होतो . . .
गुरूचे मार्गदर्शन आणि साधकाचा अभ्यास
मग ही शक्ती कशी मिळवायची हा प्रश्न राहतोच . याकरिता अनेकांनी अनेक उत्तरे दिली आहेत . भावनावादी म्हणतात . गुरूने शिष्याच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे ज्ञान हाते . गुरूंच्या या प्रसादामुळे शिष्याच्या चित्तात आपोआप काही प्रयास न करता ही प्रतिकिया घळते. दुसरे काही लोक म्हणतात की गुरु अथवा अनुभवी मनुष्य इतरांना आपले अनुभव सांगून मार्गदर्शन करतो अमुक मार्गाने जा म्हणजे तुला आत्मस्थिती चा लाभ होईल असा

त्याला उपदेश करतो . असे जर आहे तर गुरूच्या संपर्कात येणारे सारे लोग त्या थोर आत्मस्थितीचे अधिकारी बनलेले दिसत नाहीत . किंवा पहिल्या मताप्रमाणे गुरूकृपा जर देता आली असती तर भारतवर्षात कोणीच अज्ञानी राहिला नसता . सर्वच मोक्षाचे अधिकारी झाले असते पण इतके संत - महातो या देशात होऊनही त्याप्रकारचे दृश्य पाहायला मिळत नाही . कोणी म्हणतात अशी गुरूकृपा कोणाला द्यायची हे गुरूवर अवलंबून असते . ती एखाद्याला कृपाप्रसाद देईल तर दुसऱ्याला देणार नाही . पण हेही मनाला पटत नाही कारण महात्मा हा विशाल हृदयाचा असतो . त्याला सर्व सारखेच असतात . त्यांच्याजवळ भेदभाव राहात नाही . नदी ज्याप्रमाणे जवळ आलेल्या सर्वांनाच पाणी देतो , सूर्य प्रकाश देते त्याप्रमाणे गुरूचेही आहे . खरी गोष्ट अशी आहे की गुरू कोणालाच कृपा देत नाही तो फक्त मार्गदर्शन करतो पण गुरूच्या मार्गदर्शनानुसार वाटचाल करून मुक्कामाला पोचणारे कमीच असतात . पण यातही गुरूचा दोष नाही . नदीवर पाण्यासाठी गेलेल्या माणसाजवळ जेवढे भांडे असेल तेवढेच पाणी त्याला घेता येईल तद्नुसार सद्गुरूच्या मार्गदर्शनाचा लाभ प्रत्येकाला आपल्या मनाच्या भावनेच्या शक्तिएवढाच घेता येईल . *कलेपेक्षा तळमळ श्रेष्ठ*
अनुभव सांगण्याच्या पध्दतीतही फरक असतो . पोथी वाचण्याची पध्दती ही वाचाळता समजावी . ते केवळ शब्दज्ञान आहे पण घेतलेला अनुभवसुध्दा दोन प्रकारांनी सांगता येतो . एकजण कलात्मक पध्दतीने सजवून सांगेल तर दुसरा हृदयांच्या तळमळीने ओबडधोबड भाषेत निवेदन करील . पण परिणामाच्या दृष्टीने दुसरा श्रेष्ठ ठरतो . कलेचा संबंध हृदयापेक्षा बाह्य ठाकठिकीशी असतो . पण भावना हृदयातल्या तळमळीशिवाय साकारच होऊ शकत नाही . एका दृष्टांताने हे सहज समजेल . बहुरूपी आपल्या कलात्मकतेने व हावभावाने एखाद्या दुःखी जीवाचे सोंग आणतो पण तो बहुरूपी आहे हे माहीत असल्यामुळे म्हणजेच त्याचे रडणे खोटे आहे याची मनाला जाणीव असल्यामुळे पाहणाऱ्याच्या अंतःकरणाला दुःखाच्या भावना जागृत होत नाहीत.
उलट एखादा दुःखी मनुष्य रडताना पाहिला की आपले अंत : करण द्रवते . कारण या दृश्यांत कृत्रिमता नसते . वेचळ स्वाभाविकता असते . तसेच आपणा सर्वांचे आहे . ज्याला अंत : करणापासून समाजाच्या प्रगतीची हाव असेल , आपल्याला गवसलेल्या लाभांचा उपयोग भोवतीच्या समाजाला व्हावा अशी प्रेरणा असेल , तो आपले अनुभव हृदयाच्या तळमळीने निवेदन करीत राहील , आणि जनमनावर त्याचा चांगला परिणामही दिसून येईल असा मनुष्य जंगलात असला , पहाडात असला किंवा गिरीकंदरात असला तरीही तो स्वत : भोवती लोकसमुदाय निर्माण करील . अशा वृत्तीचा माणूस हाच खरा माणूस होय . त्याला जगातील दुःख नजरेने बघवत नाही . म्हणून या दुःख निवारणाचा मार्ग तो लोकांना अत्यंत तळमळीने सांगत राहतो . दुसरा कलावंत वृत्तीचा पुरूष आपले अनुभव कलेच्या माध्यमातून कलात्मकपणे सांगण्याचा प्रयत्न करील . पण त्या सांगण्यात शब्दावडंबरच अधिक प्रमाणात राहील . या सांगण्याला साहित्यिक मूल्ये जरूर राहतील . मोहकताही खूप असेल . पण त्यातून लोकांना खरे मार्गदर्शन होणार नाही . या कलावंताला लोकांच्या विकासापेक्षा आपल्या कलेचे अधिक महत्व असते . श्रीमंतांच्या तळमळीतून ज्याप्रमाणे भोवतीचा समाज श्रीमंत न होता दरिद्रीच राहतो त्याप्रमाणे अशा कलावंताच्या अनुभवाचेही होते . ते अनुभव ऐकायला - वाचायला गोड वाटले तरीसुध्दा परिणामाच्या दृष्टीने ते शून्य ठरतात . कारण त्यामधील सारा आशय , अनुभवातील सारा जीवंतपणा शब्दांच्या अवडंबराखाली लोपून जातो .
बाह्य शिस्तीपेक्षा अंतरंग अधिक महत्वाचे
कोणत्याही संप्रदायात जी कोणती साधना - पध्दती निर्माण केली जात असते तिचे शेवटी रूढीत रूपांतर होत असते . तिच्यातील प्राण केव्हाच निघून जातो . आजवर जेवढे म्हणून संप्रदाय निर्माण झाले त्या सर्वांचे संस्थापक हाते तोवर त्या संप्रदायात प्राण राहिला त्यानंतर मात्र त्या संप्रदायाची रूढी च्या रूपात केवळ मढी राहिली. शाळेचा शिक्षक विद्यार्थ्याला पाच करून देण्याची जबाबदारी स्वीकारतो. मात्र आपण शिकवलेले त्याच्या जीवनात उतरले की

नाही , त्याला ते पचले की नाही याचा विचार शिक्षक कधी करीत नाही . त्या पुढे या संप्रदायाची गत होते . कोणताही संप्रदाय केवळ बाह्य शिस्ती जगण्याचा प्रशत्न करीत असेल , जीवनाच्या शुद्धतेकडे त्याचे लक्ष नसेल त्या संप्रदायाची सारी धडपड व्यर्थ आहे . आपल्या गुरुदेव सेवामंडळाचेही लक्ष भगवी टोपी , निळी काच , आसन याकडेच राहीत तर याही संप्रदायाची तीच अवस्था होईल . या धोक्यातून आपणाला वाचायचे असेल तर त्या संप्रदायाने प्राणभूत तत्व , जिवंत ध्येय आपण आत्मसात करून जतन केले पाहिजे. कोणत्याही गोष्टीच्या परिणामाकडे लक्ष ठेवणे आवश्यक असते . एखाद्या गावात रामधून पंधरा - वीस वर्षे चालूनही जर ते गाव अस्वच्छच राहीले तर त्या रामधूनमध्ये काही अर्थ नव्हता असे मानावे लागेल .
प्रचारकांची सावधानता
कोणत्याही संप्रदायाची बैठक प्रचारकाच्या सावधानतेवर अवलंबून असते . प्रचारकाचा मार्ग चुकला की सर्वच बिघडते . गुरुदेव सेवा मंडळाबाबतही आम्ही हीच गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे . प्रचारक फक्त धार्मिकताच पाहतो की समाजाचा सर्वांगीण उणीवांचा विचार करतो ? तो फक्त खाण्याचेच काम करतो
की जमिनीला खत कसे मिळेल , उत्पादन कसे वाढेल याचा विचार करतो या गोष्टीची नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे . लोक - जीवनाशी संबंधित अशा बाबींवर जर सेवामंडळ भर देणार नाही तर इतर सर्व संप्रदायाची जी गत झाली तीच सेवामंडळाची हाईल केवळ हजार पाचशे लोकांसाठी जग अडून राहत नाही . जे जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवतील त्यांचीच जनता कदर करील . यासाठी आपण आपल्या कामाचे परिणाम तपासून घेतले पाहिजेत . आपण केलेल्या धडपडीचे मान्य केलेल्या ध्येयवादाचे योग्य फळ आपल्याला गवसले नसेल तर आपल्यातच कुठेतरी गंभीर चूक झाली असावी असे आपण मानले पाहिजे १४ - ८ - ५८
सायंकाळ